उपयुक्त संकेतस्थळे
Informative Links


ह्रदय ज्योत पुस्तिका

"ह्र्दय ज्योत परिवार" न्यासा तर्फे गेली ४ वर्ष जन्मतः ह्र्दयदोष असणार्‍या लहान मुलांसाठी कार्य केले जात आहे. विशेषतः ग्रामीण भागात काम करताना रुग्ण किंवा त्याच्या आई वडील अथवा नातेवाईकांना समजाविताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, क्लिष्ट वैद्दकिय भाषेतील गोष्टी सहज सोप्या भाषेत समजाविणे फार जड जाते आहे. 

                 कधी कधी एकदा सांगितलेली माहिती पुन्हा पुन्हा सांगावी लागते, आणि तरीही सगळ्या गोष्टी लक्षात राहतातच असे नाही.  आधीच ह्र्दयरोगाला सामोरे जाणार्‍या या लोकांना सोप्या भाषेत आवश्यक त्या गोष्टी समजतील असे एखादे छोटेसे पुस्तक असावे असा विचार मनात आला. 

              हा विचार मी ह्रदयशल्यचिकीत्सा तज्ञ डॉ. नित्यानंद ठाकूर यांना बोलून दाखविला व ते लगेचच तयार झाले. आपला बहुमोल वेळ देऊन त्यांनी सोप्या भाषेत वैद्दकिय विषयाची मांडणी करुन दिली. त्यातच आर्थिक मदतीबाबतचा भाग जोडून ही पुस्तिका तयार करण्याचे ठरले.

             आपल्या कुटुंबातील बाळास ह्र्दयदोष आढळून आल्यास ही पुस्तिका आपल्याला मार्गदर्शक ठरावी ही संकल्पना. पुस्तिका न्यासाच्या कार्यालयात उपलब्ध आहे. 

- ज्योती मुंगसे.

पान १ पान २ पान ३ पान ४ पान ५ पान ६ पान ७ पान ८ पान ९

ह्र्दय दोषांसंबन्धी काही उपयुक्त संकेतस्थळे 

Following are some useful links

Make a Free Website with Yola.