ह्रदय-ज्योत परिवार मध्ये आपले स्वागत !
Welcome to Hriday Jyot Pariwar


 ह्रदय-ज्योत परिवार 

       जन्मजात ह्रदय दोष असणार्‍यांसाठी सेवा-भावी संस्था 

"ह्र्दय ज्योत परिवार" हा न्यास ( ट्रस्ट) ३ जुन २००४ रोजी  मुख्यत: जन्मजात ह्र्दय दोष असणार्‍या लहान मुलांसाठी स्थापन करण्यात आला आहे.  न्यासाची नोंदणी  मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था आधिनियम, १९५० अन्वये पुणे येथे केली आहे. ह्या न्यासाच्या संस्थापिका व अध्यक्षा श्रीमती ज्योती मुंगसे ह्यांना सुध्दा जन्मजात ह्र्दय दोष आहे. त्यामुळे ह्र्दय दोष असणार्‍या मुलांच्या पालकांना किती त्रास सहन करवा लागतो याचा अनुभव आल्या मुळे असा न्यास स्थापन करण्याची संकल्पना पुढे आली, व ती अंमलात आली.

                 न्यासा तर्फे प्रामुख्याने लहान मुलांच्या पालकांना समुपदेशना मार्फत मानसिक आधार दिला जातो, तसेच ह्र्दय शस्त्रक्रियेसाठी निधी संकलनाबाबत आवश्यक ती सर्व माहिती पुरविली जाते. आणि शस्त्रक्रिया होई पर्यंत पालकांना मार्गदर्शन केले जाते. रुग्ण बरा होई पर्यंत त्यांच्याशी संपर्क ठेवला जातो. दारिद्रय रेषेखालील आणि अत्यंत गरजु रुग्णांनाच आर्थिक मदत न्यासातर्फे करण्यात येते. गावोगावी जाउन ह्र्दयासंबंधीच्या सर्व आजाराबददल जनजागृती केली जाते. त्या अनुषंगाने बारामती, संगमनेर आणि नाशिक या ठिकाणी न्यासातर्फे समुपदेशन केंद्रे सुरु करण्यात आली आहेत.

              भविष्यात न्यासातर्फे जन्मजात ह्र्दयदोष असणारे व कधीही बरे न होणार्‍या रुग्णांसाठी सर्व वैद्यकिय सोई-सुविधांनी युक्त असा आश्रम स्थापन करणे आणि निरनिराळे लघु उद्दोग सुरु करुन ह्रदय रुग्णांना रोजगार मिळवून देण्यास सहाय्य करण्याचा मानस आहे.


HRIDAY-JYOT PARIWAR


Social service trust for people with Congenital Heart Disease

Hriday-Jyot pariwar was founded in Pune, India by Miss Jyoti H Mungse. Jyoti, herself a congenital heart defect patient, has been actively working on bringing awareness and help to other patients. This non-profit organization works primarily in Maharastra with focus on rural area.


Currently pariwar has set-up satellite centers in Baramati, Sangamner and Nashik. Next target is Sangli and Miraj. Pariwar has helped many patients with economic difficulty to get access to required medical help. We work with other charitable organizations to arrange financial help for the needy.

The decoumentary "Hrudayachi Gostha" by hriday-jyot pariwar

Make a Free Website with Yola.